श्रीगोंदा कारखाना निवडणुकीत 28 अर्ज बाद

jalgaon-digital
2 Min Read

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक अर्ज छाननीत सर्व मतदारसंघातील 222 अर्ज वैध ठरले तर 28 अर्ज बाद करण्यात आले. बहुतेक अर्ज पंचवार्षिक गाळप हंगामात तीन वेळा ऊस गाळपास आला नसेल तर सहकार निवडणूक नियमानुसार बाद करण्यात आले.

कारखान्याच्या निवडणुकीत 21 जागांसाठी एकूण 306 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी (दि.20) निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले व सहाय्यक निवडणूक अधिकारी व तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासमोर अर्जांची छाननी व हरकतींवर सुनावणी पार पडली. या सर्वसाधारण मतदार संघात श्रीगोंदा गट 12 वैध 8 अर्ज अवैध, काष्टी गट 17 वैध 1 अर्ज अवैध, कोळगाव गट 24 वैध, बेलवंडी गट 31 वैध 8 अर्ज अवैध, टाकळी कडेवळीत गट 26 वैध 4अर्ज अवैध, व लिंपणगाव गट 28 वैध 6 अर्ज अवैध झाले तर उत्पादक सहकारी संस्था मतदार संघात 5 अर्ज वैध झाले. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात 8 अर्ज वैध झाले. महिला प्रतिनिधी मतदार संघात 34 अर्ज वैध झाले. इतर मागास प्रवर्ग मतदार संघात 24 अर्ज वैध, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संघात 13 अर्ज वैध झाले.

विद्यमान चेअरमन राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, केशवराव मगर, जिजाबापू शिंदे, भगवानराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, अण्णासाहेब शेलार या प्रमुख उमेदवारांबरोबर 222 अर्ज वैध ठरले तर संदीप नागवडे, प्रमोद शिंदे, गणपतराव काकडे या उमेदवारांबरोबर 28 अर्ज अवैध ठरले. 13 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. अर्ज मागे घेण्याची मुदत 5 जानेवारी पर्यंत आहे. तर. 14 रोजी प्रत्यक्षात मतदान होऊन 19,841 पात्र सभासद मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *