Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक कृषी उत्पन्न समितीच्या संचालक पदाचा शिवाजी चुंभळे यांचा राजीनामा

नाशिक कृषी उत्पन्न समितीच्या संचालक पदाचा शिवाजी चुंभळे यांचा राजीनामा

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन शेतकरी, व्यापारी व कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकत नसुन विदयमान संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिली.

- Advertisement -

यावेळी चुंभळे यांनी सांगितले की, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती असतांना अडीच वर्षाच्या कालावधीत तोट्यात असलेल्या बाजार समितीला नफ्यात आनुन कोटयावधी रुपयांच्या ठेवी मिळवुन देणारा मी पहिला सभापती होतो.

सध्याचे विदयमान संचालक त्यांच्या बहुमताचा फायदा घेऊन मनमानी कारभार करत आहेत. सभेत मी एकटा विरोधक असल्याने माझे म्हणणे ऐकुन घेत नव्हते व मला बोलण्याची संधी देत नव्हते, तसेच संचालक मंडळ सभेत विरोधी मत प्रदर्शित केल्यास त्याची दखल इतिवृत्तात घेतली जात नव्हती.

त्यांच्या बेकादेशिर कामांना तसेच त्यांच्या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठविल्यास पोलिसांत खोटे तक्रारी देऊन माझ्या विरोधात गुन्हे दाखल करत होते. तसेच माझ्यावर दडपण आणत होते. असे चुंभळे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, माझा सभापतीच्या कार्यकाळ फेब्रुवारी २०२० अखेर पर्यत होता. त्या वेळी समितीच्या बॅक खात्यावर १ कोटी ७० लाख शिल्लक होते.विद्यमान संचालकांच्या काळात त्या खात्यातुन मोठ्या रकमा कमी झाल्या आहेत.

तसेच या संचालकांनी कर्मचारी यांचे पि एफ, अंशदान ग्रॅज्युइटी, शासनाची थकविलेली सुपर विजन फी, पणन मंडळाचे थकीत कर्ज, आयकर असा सुमारे १२ कोटीचा भरणा माझ्या कारकिर्दीत झाला आहे.

विदयमान सभापतीने महागडी कार खरेदी केली, त्यांना सहिचा अधिकार नसतांना सुध्दा ते कारचा वापर का करतात हे समजत नाही. अश्या विद्यमान संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा दिला आहे असे चुंभळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या