Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामहाशिवरात्रीनिमित्त आकर्षक रोषणाईने सजली शिवमंदिरे

महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक रोषणाईने सजली शिवमंदिरे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील महादेव मंदिर (Mahadev Temple) तसेच रामकुंडावर (Ramkund) असणार्‍या प्राचीन कपालेश्वर मंदिर (Kapaleshwar Temple) महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivaratri) सजवण्यात आले आहे. मंदिरांच्या परिसरात आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे…

- Advertisement -

यावर्षी भाविकांना दिवसभर दर्शनाचा लाभ मिळणार आहे. करोनामुळे (Corona) दोन वर्षांपासून मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांना दर्शन घेता येत नव्हते. मात्र यावर्षी संपूर्ण दिवसभर दर्शन घेता यावे म्हणून मंदिर खुले राहणार आहे.

शिवरात्रीच्या दिवशी सकाळी महापूजा होणार आहे. भाविकांकडून दुधाचा अभिषेक करण्यात येईल. कपालेश्वर मंदिरात सायंकाळी चार वाजता शरद दीक्षित (Sharad Dixit) यांच्या हस्ते पालखीचे पूजन होऊन पालखी शनि चौक, काळाराम मंदिर, सरदार चौकवरून रामकुंडावर येईल. तहसीलदार अनिल दोंदे (Anil Donde), नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे (Sitaram Kolhe), भाऊसाहेब गंभीरे (Bhausaheb Gambhire) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.

ज्यांना कपालेश्वर मंदिराच्या पायर्‍या चढता येणार नाही, त्यांच्यासाठी यावर्षी खास रामकुंडावर स्क्रीन लावण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गाभार्‍यातील दर्शन घेता येईल. यासाठी काळाराम मंदिर (Kalaram Temple) संस्थानचे सर्व पदाधिकारी व व्यवस्थापक संकेत मुर्तडक हे प्रयत्नशील आहेत.

तसेच हिरावाडीतील भाऊसाहेब हिरे सोसायटी येथील सिद्धेश्वर मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले आहे. मोठ्या प्रमाणात भाविक सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. सिद्धेश्वर मित्र मंडळ यासाठी परिश्रम घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या