Friday, April 26, 2024
Homeजळगावचाळीसगाव :शिवपूजनाने महारांजांना मानाचा मुजरा

चाळीसगाव :शिवपूजनाने महारांजांना मानाचा मुजरा

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने चाळीसगाव शहर हे भगवे झेंडे व पतकांनी भगवेमय झाले आहे. तर शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी संकाळपासून सिग्नल चौकासह मुख्य रस्त्यावर शिवपुतला व प्रतिमांचे ठिकठिकाणी पूजन करुन महारांजाना मानांचा मुजरा घालत अभिवादन केले.

- Advertisement -

शहरातील स्वराज्य निर्माण सेनेतर्फे सलग ४ वर्षांपासून चाळीसगाव येथे दर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता शिव वंदना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ( महाराजांना मानवंदना ) देण्याचे कार्य केले जात आहे. आजही शिवजयंती निमित्ताने शिवपूजन करण्यासाठी स्वराज्य रक्षक हे नियोजित शिवाजी महाराज्या पुतळ्याचेे जागेच्या ठिकाणी एकत्र जमले, बालशिवाजी वेषभूषेतील शिवाजी महाराजांचेे पूजन केले. तर शहरातील सिग्नल चौकात ‘ शिवाजी समजून येतांना ’ हा पुस्तक वाटपाचा उपक्रम कल्पेश देशमुख व सागर नागने यांच्यासह काही तरुणानी राबविला, यात शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तक प्रा.गौतम निकम यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. तसेच प्रा.गौतम निकम यांनी लिखीत पुस्तकांचे देखील यावेळी वाटप करण्यात आले. तसेच सिग्नल चौकात शिवपुतळा ठेवण्यात आला होता. या ठिकाणी अनेक तरुणासह, पुरुष महिलांनी शिवपूजन करुन शिवाजी महारांंजान अभिवादन करत, मानांचा मुजरा घातला.

- Advertisment -

ताज्या बातम्या