संजय राऊतांसह गुलाबराव पाटील शिवसेनेचे प्रवक्ते

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई

शिवसेनेतर्फे पक्षातील प्रवक्तांची यादी जाहीर झाली आहे. त्यात मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे ही प्रवक्ते असणार आहेत.

शिवसेनेने संजय राऊत यांच्यासह दहा जणांची प्रवक्ते म्हणून निवड केली. त्यात खासदार अरविंद सावंत, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार निलम गोऱ्हे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुनिल प्रभू यांचीही प्रवक्ते म्हणून घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यलकडून करण्यात आली आहे. यावेळी राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचीही प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *