Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशकरोनाचा धोका वाढला : अणू शास्त्रज्ञाचे निधन, शिवसेनेच्या दिग्गज नेत्यास करोना

करोनाचा धोका वाढला : अणू शास्त्रज्ञाचे निधन, शिवसेनेच्या दिग्गज नेत्यास करोना

मुंबई, दिल्ली

करोनाचा धोका देशात वाढत चालला आहे. बुधवारी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे करोनामुळे निधन झाले होते. गुरुवारी अणू शास्त्रज्ञचे निधन झाले असून शिवसेनेच्या दिग्गज नेत्यासही करोना झाला आहे.

- Advertisement -

अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मक्षी डॉ. शेखर बसू यांचे करोनामुळे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्यावर कोलकातातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच डॉ. बसू यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाले होते. अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राहिलेल्या डॉ. बसू यांना २०१४मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

एकनाथ शिंदे यांना करोना

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

देशात आता ५७ लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण झाले असून ९१ हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या