Wednesday, April 24, 2024
Homeनगरगद्दारांनी राजीनामा देवून निवडणुकांना सामोरे जाऊन दाखवावे - आदित्य ठाकरे

गद्दारांनी राजीनामा देवून निवडणुकांना सामोरे जाऊन दाखवावे – आदित्य ठाकरे

नेवासा |का प्रतिनिधी| Newasa

बंडखोर बंड नाही उठाव आहे असे काहीही बोलत असले तरी गद्दार हा गद्दारच असतो त्यांनी हिम्मत असेल तर आधी राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जावे असे आव्हान युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. आमदार शंकरराव गडाख सध्याच्या परिस्थितीतही शिवसेनेबरोबर राहिले याबद्दल त्यांनी कौतुक केले.

- Advertisement -

शिवसंवाद अभियानांतर्गत नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, उदयन गडाख, आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ व उदयन दादा गडाख मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

भर पावसात आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. राजमुद्रा चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला त्यांनीबअभिवादन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद अभियानाचा हेतू स्पष्ट केला. 40 आमदार व बारा खासदारांनी सर्व काही चांगले चाललेले असताना शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला.

ते स्वतःला गद्दार नसल्याचे व बंड केले नसल्याचे व उठाव केला असल्याचे सांगत आहेत पण गद्दार हा गद्दारच असतो. हिम्मत असेल तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा व निवडणुकांना सामोरे जाऊन दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक भर पावसात उभे होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या