Tuesday, April 23, 2024
Homeजळगावफुटीर आमदारांच्या बंडाने शिवसैनिकांमध्ये खदखद

फुटीर आमदारांच्या बंडाने शिवसैनिकांमध्ये खदखद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांच्यासह राज्यातील काही बंडखोर आमदार (Rebel MLA) गुवाहटीत दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात जिल्ह्यातील सहयोगी आमदारांसह चार आमदारांचा देखील समावेश आहे. शिवसेना पक्षप्रमुखांसह (Shiv Sena party chief) नेत्यांनी शिवसेना आमदारांनो, परत फिरा रे पाखरांनो, शिवसेनेचे घरटे तुटण्यापासून वाचेल, अशी हार्त हाक घातली. मात्र, बंडखोर आमदारांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद (Positive response) न मिळाल्याने आता शिवसेना पक्षप्रमुखांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक घेऊन या बंडखोर आमदारांसाठी (rebel MLAs) शिवसेनेचा दरवाजा बंद (Shiv Sena’s door closed) केल्याचेे जाहीर करताच शिवसैनिकांमध्ये या बंडखोरांविषयी खदखद सुरु झाली.

- Advertisement -

ग्रामीण भागातील शिवसैनिक फक्त अन् फक्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेनेला मानणारी असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच समर्थन राहील, असा सूर शिवसेनेच्या आजी-माजी जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा उमटला.

बंडखोर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जिल्ह्यातील पाचही आमदार सहभागी झाल्याने जळगाव जिल्ह्यातील मतदार संघात शिवसैनिकांमध्ये असंतोष वाढीस लागलेला आहे. तर काही जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी मवाळ भूमिका घेतली आहे. मात्र, जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, आ.लत्ता सोनवणे, सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदार संघात शिवसैनिकांमध्ये घालमेल सुरु झालेली आहे.

मात्र, जोपर्यंत फुटीर पाचही आमदार जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर खर्‍या शिवसैनिकांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. कोण फुटीर शिंदे गटात दाखल होणार आणि कोण मूळ शिवसैनिक गटात राहील,याविषयी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये चलबिचल सुरु झालेली आहे. तर काही शिवसैनिकांमध्ये जिल्ह्यातील नेत्यांनी असे काय केले? शिवसेनेने खूप काही दिले तरीही शिंदे गटात जाऊन बंडखोरी करण्यामागे रहस्य काय असेल? परत शिवसेनेमध्ये आमदारांनी दाखल व्हावे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागितल्यास त्यांना माफ करतील. त्यांनी शिवसेनेवरच निष्ठा कायम ठेवावी. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष असून नेत्यांचा मार्ग चुकला तर शिवसैनिक काय आदर्श घेतील, अशी चर्चा कट्ट्या-कट्ट्यांवर चर्चा रंगू लागल्या आहेत.

यासंदर्भात जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी कोणतीही भूमिका घेतली तरी आम्ही मुळाच बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याने शिवसेनेतच राहू,अशी पुष्टी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य नानाभाऊ महाजन, माजी जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, एरंडोल शिवसेना उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी यांनी दिली.

डॅमेज कंट्रोलसाठी होणार बैठका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या शिवसेना भवनात राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची दोन दिवस बैठका घेऊन मार्गदशर्र्न केले. त्यात जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने,विष्णू भंगाळे, समाधान महाजन यांनीही बैठकीला उपस्थिती दिली असून आता जिल्ह्यात शिवसेना डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी बैठका होण्याचे संकेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या