५ जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

नाशिक । Nashik

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या (All India Shiv Rajyabhishek Mahotsav Samiti) वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर (Durgaraj Raigad) ५ जून २०२२ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती (Yuvraj Sambhaji Chhatrapati) व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती (Yuvraj Kumar Shahaji Raje Chhatrapati) यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे…

यंदाच्या शिवराज्याभिषेक महोत्सवाचे धार ‘तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची ‘ ‘जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा’ ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा ‘ हे या कार्यक्रमाचे आकर्षण बिंदू राहणार असून देशभरातील लाखो शिवभक्तानी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे .

युगपुरुष छत्रपती शिवरायांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर स्वराज्याची उभारणी केली. अठरा पगड जाती , बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्यात ऐक्य घडवले , शत्रूवर जरब बसवत रयतेला स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला.छत्रपती शिवरायांचा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला छत्रपती मिळाले. महाराष्ट्रासह देशभरात ही घटना इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद घेणारी ठरली.

हा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन तो ‘ राष्ट्रीय सण म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे. राज्याभिषेकाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी समितीतर्फे दरवर्षी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो . यंदाही हा सोहळा ५ व ६ जूनला विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे .

छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj and Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांचे वारसदार युवराज संभाजी छत्रपती महाराज (Yuvraj Sambhaji Chhatrapati) यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. देशभरातून इतिहास संशोधक अभ्यासक (History researcher practitioner) शिवभक्त (Shiva devotee) इतिहासप्रेमी (history lover) या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

यंदा गडावर पाच जूनला सायंकाळी पाच वाजता ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची ‘ हा शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार असून युद्धकलासह विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. तर सायंकाळी सात वाजता राज दरबार येथे ‘जागर शिवशाहीरांच्या स्वराज्याच्या इतिहासाचा ‘ हा शाहीरी कार्यक्रम होणार आहे .या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शाहीर सहभाग घेणार आहेत.

या वर्षीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यांमध्ये नाशिककरांना अनेक बहुमान मिळाले असून त्यामध्ये रायरेश्वराच्या मंदिराची सजावट राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने गडाच्या पायथ्याशी पंचवीस हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था यावर्षी शाहिरी प्रोग्राम मध्ये नाशिकचे शाहीर स्वप्निल डुंबरे व ढोल पथक यांचा आवाज घुमणार त्यामुळे नाशिककरांसाठी ह्या वर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा हा आनंद हर्ष उल्हास करणारा आहे यावेळी रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचे व स्टिकर चे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

करण गायकर – शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगडचे सदस्य

अशी आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याची रुपरेषा

दि .५ जून २०२२

दु . ४:०० युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे चित्त दरवाजा येथे भव्य स्वागत व शिवभक्तांच्या समवेत पायी गड चालण्यास प्रारंभ . स्थळ चित्त दरवाजा

सायं . ५.०० वा गडपूजन ( २१ गावांतील सरपंच व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या उपस्थिती स्थळ नगारखाना .

सायं . ५:०० धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची स्थळ- होळीचा माळ ,

सायं . ६.०० गतवैभव रायगडाचे कार्य रायगड विकास प्राधिकरणाचे या विषयावर विस्तृत सादरीकरण. स्थळ हत्तीखाना

सायं ७.०० ‘जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा ‘ , स्थळ : राज दरबार

रात्री ९.०० गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ. स्थळ शिरकाई मंदिर

रात्री ९ : ३०- जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन , जागर व काकड आरती . स्थळ- जगदीश्वर मंदिर ,

रात्री ९ : ०० अन्नछत्र स्थळ -जिल्हापरिषद धर्मशाळा आणि पायथा

दि . ६ जून २०२२

सकाळी . ६:०० ध्वजपूजन , ध्वजारोहन व जयघोष रणवाद्यांचा स्थळ- नगारखाना ,

स .६:५० – शाहिरी कार्यक्रम स्थळ-राज दरबार

स . ९ : ३० – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन स्थळ राजसदर

स. ९.५० युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व मिरवणुकीने राजसदरेवर आगमन ,

स . १०:१० युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक ,

स . १०:२० मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक

स . १० : २५ – प्रास्ताविक अध्यक्ष , अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती .

स . १०:३० – युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन .

स . ११:०० सोहळा पालखींचा , स्वराज्याच्या ऐक्याचा ‘ शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभ .

दु . १२:०० – जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा .

दु . १२ : १० युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे समाधीस अभिवादन .


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *