Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedकिल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा, पाहा फोटो

किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा, पाहा फोटो

महाराष्ट्रामध्ये आज शिवजयंती सोहळ्याचा उत्साह आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा ३९१ वी जयंती आहे.

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास छत्रपती संभाजीराजे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, डॉ.अमोल कोल्हे, अतुल बेनके, विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षनिर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते.

- Advertisement -

तसेच, देशाची राजधानी दिल्ली येथे आज शिवजयंती उत्साहात साजरी झाली. संसदेच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला श्रीमंत यौवराज शहाजीराजे संभाजी छत्रपती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन,उत्सवाला सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र सदन येथे पारंपरिक पध्दतीने पाळणा पुजन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या