Friday, April 26, 2024
Homeनगरइलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर सर्वांसाठी हितकारक

इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर सर्वांसाठी हितकारक

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

सध्या सर्वच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पध्दतीचा वापर केला जात आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या प्रकरणाला लागणारा वेळ, कागदपत्रे आणि त्रुटी यामध्ये अनेक दिवस निघून जातात.

- Advertisement -

त्यामुळे वेळ आणि चुका कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केल्यास तो सर्वांसाठी हितकारक ठरणार असल्याचे मत शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी मांडले.

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अंतर्गत जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत सन 2021-22 या कालावधीचा वार्षिक विकास आराखडा तयार करणेबाबत तालुका स्तरीय पदाधिकारी, अधिकारी यांची एक दिवशीय कार्यशाळा शेवगाव पंचायत समितीमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते.

श्री. घुले म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास साधला जातो. यामध्ये मुख्यतः स्वच्छता आणि पाणी पुरवठा या दोन मूलभूत गोष्टींवर भर देणार असून या कामासाठी 50 टक्के निधी राखून ठेवणार आहे. मागील तीन वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याचा संघर्ष तालुक्यातील कित्येक गावांनी अनुभवला या वर्षी पर्जन्यमान चांगले असले तरी पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

राळेगण सिद्धी किंवा पोपट पवारांचे हिवरे बाजार असेल त्या पद्धतीचे मॉडेल व्हिलेजेस सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम 15 व्या वित्त आयोगातून तयार करणार आहोत. करोना काळात आरोग्य यंत्रणेतील तालुका आरोग्य आधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी उत्तम नियोजन करत डॉक्टर्स, सिस्टर व कर्मचारी स्टाफ याच्या माध्यमातून तालुक्यात करोनाला रोखून धरण्याचे काम केले.

तसेच ग्रामपंचायत पातळीवर सर्वच कर्मचार्‍यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विविध प्रकरणाच्या कागदपत्रांची फाईल ही स्कॅन पद्धतीने जिल्हा परिषदेला पाठवण्या संदर्भात प्रस्ताव देखील दिला आहे. तर येणार्‍या प्रकरणाचा निधी हा आरटीजीएस पध्दतीने पाठवल्यास वेळ कमी लागणार आहे.

या कार्यशाळेत सभापती डॉ. क्षितीज घुले, शिवाजी नेमाने, सदस्य मंगेश थोरात, भाऊराव भोगळे, सरपंच संतोष पावसे गटविकास अधिकारी महेश डोके विस्तार अधिकारी मल्हारी ईसरवाडे, घरकुल विभागाचे जगताप, एम.आर.जि. एसचे सचिन भाकरे, कृषीचे रामकिसन जाधव, प्रभाकर गटकळ आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या