Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedवेस जीर्णोद्धार गरजेचा

वेस जीर्णोद्धार गरजेचा

शिरवाडे वणी । दिलीप निफाडे

पूर्वीच्या काळी गावात प्रवेश करण्यासाठी वेस बांधलेली असत. परंतु आता येथील गावाची वेस अतिशय जीर्ण झाली असून वेशीच्या बुरुजांची बरीच पडझड झाली आहे. त्यामुळे हा पुरातन ठेवा जतन करण्यासाठी येथील वेशीचा जीर्णोद्धार (Restoration) करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

शिरवाडे वणी (Shirwade wani) हे गाव तालुक्याच्या उत्तरेला अगदी शेवटचा टोकाला मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ लगत दक्षिण वाहिनी काजळी नदीच्या (Kajli River) तीरालगत अतिशय सुटसुटीत, सुंदर व मैलभर विणलेल्या जाळ्याप्रमाणे विखुरलेले तसेच पसरलेले आहे. ब्रिटिश राजवटीत (British rule) सुमारे १८०० साला दरम्यान ब्रिटिशांनी शिरवाडकर यांना शिरवाडे हे गाव इनाम दिले आहे. कित्येक वर्षांपासून कुसुमाग्रजांच्या या गावात प्रवेश करताना अर्धवट सिमेंटमधील बांधलेले बुरुज आजही गावाचे गाव पण दाखवीत आहे.

मुंबई-आग्रा महामार्गापासून (Mumbai-Agra Highway) लासलगावकडे (Lasalgaon) जाणारा मुख्य रस्ता या वेशी जवळून जात असल्याने रस्त्याने ये-जा करणारे या बुरुज स्वरूपी वेशीकडे बघून थक्क होत असतात व ते विचारणा करीत असतात हे अर्धवट बुरुज गावाने कशाला बांधून ठेवले असतील.

उभ्या महाराष्ट्रात (Maharashtra) प्रसिद्ध असलेल्या कुसुमाग्रजांच्या गावात प्रवेश करताना कुसुमाग्रजांमुळे आदर्श झालेल्या तसेच टूमदार गावात उपेक्षितांच्या वेदनेला मानवतेची फुंकर घालणारे विचारवंत कुसुमाग्रज यांच्या ओढीमुळे गावाला भेट देण्यासाठी सहज गावातून फेरफटका मारून जावा. तसेच कुसुमाग्रजांच्या कुटुंबीयांचे गावातील काय वैभव होते हे पाहण्यासाठी या हेतूने पर्यटक अथवा पर्यावरण प्रेमी तसेच कुसुमाग्रज यांचे चाहते यांच्या प्रतिक्रियेतून त्यांना वेशीतून नव्हे, तर पूर्वीच्या काळी बांधलेल्या अर्धवट बुरुजातून आत गेल्यासारखे वाटत असते.

गावाबाहेर भव्य स्वरूपात उभारणी झालेले मंदिरे (Temples) विविध प्रकारच्या शाळा व गावामध्ये प्रवेश केल्यानंतर कुसुमाग्रजांच्या नावाखाली चुटकी सरशी विविध प्रकारच्या कोट्यवधी रुपये निधीच्या माध्यमातून झालेले विकासकामे पहावयास मिळतात. त्यामुळे गावाची बुरुज स्वरूपी वेस विलोभनीय दिसत असून शोभनीय वाटत नसल्यामुळे गावातील नागरिक व ग्रामस्थांनी ’गाव तसं चांगलं पण वेशीला टांगल’ असं म्हणू लागले आहे. असे असताना देखील या बुरुज स्वरूपी वेशीकडे कोणाचे लक्ष जाईल का असा प्रश्न विचारला जात आहे.

गेल्या साठ वर्षाच्या कारकिर्दीत गावात (village) अनेक पुढारी होऊन गेले परंतु गावातील विकासकामे करताना गावाचा प्रवेशद्वारा जवळील मुख्य बुरुज स्वरूपी वेशीकडे अद्यापही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. गावातील वेस (Weiss) ही घराच्या उंबर्‍याप्रमाणे असून घर बांधताना जशी आपण चौकटीची उभारणी करत असतो. त्याप्रमाणेच गावाच्या वेशीला देखील भव्य स्वरूपात उभारणी करणे गरजेचे आहे. गावाच्या वेशीवरून गावाचे गाव पण समजत असते तरी प्राचीन काळी बांधलेल्या या बुरुज स्वरूपी वेशीचा जीर्णोद्धार करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या