Friday, April 26, 2024
Homeधुळेपिंप्रीपाडा शिवारातील गांजाच्या शेतीवर नांगर

पिंप्रीपाडा शिवारातील गांजाच्या शेतीवर नांगर

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

तालुक्यातील पिंप्रीपाडा शिवारातील वनजमिनीवरील बेकायदेशीर गांजाच्या शेतीवर शिरपूर शहर पोलिसांनी कारवाई केली.

- Advertisement -

एकुण 2 लाख 20 हजार 490 रूपयांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथकाने काल सायंकाळी ही कारवाई केली.

दिलीप शंभु पावरा (रा. चांदसुर्या ता. शिरपूर) याने पिंप्रीपाडा शिवारातील वनजमिनीवरील शेतात गांजाची लागवड करून बेकायदशीररित्या गांजाची शेती करीत होता.

पोलिसांनी छापा टाकत तपासणी केली असता शेतात कपाशीच्या पिकाआड गांजाची लागवड केलेली आढळून आली.

पोलिसांनी शेतातील एकुण 2 लाख 20 हजार 490 रूपयांची गांजाची झाडे फांद्यासह जप्त केली. याप्रकरणी पोकाँ अमित रनमळे यांच्या फिर्यादीवरून दिलीप पावरा याच्याविरूध्द शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करणयात आला आहे.

ही कारवाई पोनि हेमंत पाटील, सपोनि चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक किरण बार्‍हे, सागर आहेर, संदीप मुरकूटे, पोना ललित पाटील, पोकाँ स्वप्नील बांगर, पोकाँ योगेश कोळी, बापुजी पाटील, एम.जी. शेख, पंकज पाटील, टि.एम. गवळी यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या