Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशिरपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी 268 नामांकन पत्रे दाखल

शिरपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी 268 नामांकन पत्रे दाखल

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

तालुक्यात 34 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी एकूण 268 नामांकन पत्रे दाखल झाले आहेत. उद्या बुधवार दि. 30 डिसेंबर रोजी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

- Advertisement -

तालुक्यात 34 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून 115 प्रभागात 314 सदस्य जागांसाठी निवडणूक सुरु झाली आहे.

शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत नामनिर्देशनपत्राची ऑनलाईन साईट सुरु झाल्यास ऑनलाईनचा अर्ज स्विकारला जाईल. परंतु ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठलाही एकच अर्ज सादर करावा, असे प्रशासनाने कळविले आहे.

पहिल्या दिवशी दि. 23 डिसेंबर रोजी दहिवद ग्रामपंचायत 1 अर्ज, दि. 24 रोजी दहिवद 6, भाटपुरा 1 अर्ज दाखल करण्यात आले.

त्यानंतर दि. 25 ते दि. 27 डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी होती. त्यामुळे नामांकन पत्रे दाखल करण्यासाठी फारच कमी कालावधी मिळाला आहे.

दि. 28 डिसेंबर रोजी 75 अर्ज दाखल करण्यात आले. यात दहिवद, भाटपुरा, हिंगोणी, वाठोडा, भटाणे, जवखेडा, विखरण, बोरगाव या ग्रामपंचायतींसाठी एकूण 75 काल दाखल करण्यात आले होते.

तसेच दि. 29 डिसेंबर रोजी दहिवद 9, टेकवाडे 15, जातोडे 13, असली 7, बाळदे 8, होळ 22, हिंगोणी बुद्रुक 7, उपरपिंड 7, नटवाडे 4, कळमसरे 1, जामन्यापाडा, गरताड 6, भटाणे 3, भाटपुरा 10, जुने भामपूर 16, मांडळ 7, वरूळ 9, विखरण 25, शिंगावे 2, सावळदे 10, साकवद 4 या ग्रामपंचायतीसाठी आज 185 अर्ज दाखल झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार आबा महाजन तसेच निवासी नायब तहसीलदार आढारी, अधिकारी, कर्मचारी निवडणुकीची जबाबदारी पार पाडत आहेत.

तालुक्यात सर्व 34 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी त्या त्या गावांमध्ये इच्छुक कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने अनेक अचूक उमेदवारांमध्ये नैराश्य दिसून येत आहे.

तरीही सर्वच्या सर्व किंवा जास्तीत जास्त जागा निवडून निवडुन कशा येतील, या दृष्टीने पदाधिकारी काम करत असून अनेक गावांमध्ये निवडणुकीला महत्त्व आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या