Saturday, April 27, 2024
Homeधुळेशेतकर्‍यांनी बाजार सचिवांसह कर्मचार्‍यांना धरले धारेवर

शेतकर्‍यांनी बाजार सचिवांसह कर्मचार्‍यांना धरले धारेवर

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

गेल्या पंधरा महिन्यांपासून व्यापारावर दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात बाजार समिती कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा करत नाही

- Advertisement -

व शेतकर्‍यांचे पैसे मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी सचिवांसह कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर घेत पोलीस स्टेशन गाठले.

गुन्हा संदर्भात सचिवांनी काय पाठपुरावा केला या संदर्भात पीएसआय भूषण हंडोरे यांना विचारण्यात आले.

त्यांनी बाजार समितीने कुठलेही कागदपत्र सादर केले नसल्याचे शेतकर्‍यांना सांगितले.लगेच शेतकरी आक्रमक होत बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली.

गेल्या पंधरा महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांनी पिंपळनेर बाजार समितीमधील व्यापारी दीपक सोनू पाटील यांनी कांदा खरेदी केला होता.

सदर व्यापार्‍याने शेतकर्‍यांचे पैसे न देता संबंधित व्यापार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंधरा महिने होऊन देखील शेतकर्‍यांना पैसे न मिळाल्याने तसेच काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशन कडून कृषी बाजार समितीला संबंधित व्यापारी विरोधात कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती.

या नोटीसला कृषी बाजार समितीने काय उत्तर दिले. हा जाब विचारण्यासाठी आज शेतकर्‍यांनी सचिव अशोक मोरे व शाखा प्रमुख संजय बावा यांना चांगलेच शेतकर्‍यांनी धारेवर धरले.

संबंधित व्यापारी दीपक पाटील यांच्याकडे 51 शेतकर्‍यांचे पैसे देणे बाकी असून बाजार समितीने फक्त बावीस शेतकर्‍यांची नावे पोलीस स्टेशनला कळविण्यात आहे.

51 शेतकर्‍यांचे सात लाख 95 हजार रक्कम संबंधित व्यापार्‍याकडे घेणे बाकी असून बाजार समितीने बावीस व्यापार्‍यांची नोंद का केली, यावरून यावेळी सचिव व शाखाप्रमुख यांचा समाचार घेतला, संबंधित व्यापाराने बाजार समितीला एक लाख रुपयाचा धनादेश दिला होता तो देखील वटवला नाही,

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार समितीने व्यापार्‍यांनी आपली कागदपत्रे जमा करावी, आपणाकडे शेतकर्‍यांची किती थकबाकी आहे याची माहिती द्यावी, सेम डे चेक द्यावा यासह कागदपत्रांची मागणी बाजार समितीने केली असता व्यापार्‍यांनी बाजार समितीच्या नियमांना न जुमानता त्याकडे कानाडोळा करीत आज लिलावासाठी दाखल झालेल्या वाहनांचा लिलाव यावेळी करण्यात आला.

पिंपळनेर सह पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी एकत्र येत बाजार समितीने अचानक बंदची घोषणा केल्याने या संदर्भात शेतकर्‍यांमध्ये राग व्यक्त करण्यात आला आता थोड्या शेतकर्‍यांकडे कांदा असल्याने मार्केट बंद राहिल्यास कांदा सडू शकतो तरी व्यापार्‍यांनी बाजार समितीच्या अंतर्गत काम न करता यापुढे आता कांदा उत्पादक शेतकरी संचलित बाजार समिती पिंपळनेर शेतकर्‍यांनी घटित करीत या मंडळात 50 शेतकर्‍यांचा सहभाग नोंदविला जाईल.

कांद्याला प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत भाव देण्यात आला. आज 60 ते 70 वाहने लिलावासाठी दाखल झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या