Friday, April 26, 2024
Homeधुळेकत्तलीसाठी जाणारी जनावरे पकडली

कत्तलीसाठी जाणारी जनावरे पकडली

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

मध्यप्रदेशातील इंदूर येथून धुळ्याकडे कत्तलीसाठी अवैधरित्या 14 जनावरे वाहनात कोंबून भरुन नेत असतांना शिरपूर टोलनाक्यानजीक वाहनासह

- Advertisement -

जनावरे असा पाच लाख 86 हजारांचा मुद्देमाल शिरपूर शहर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एका विरुध्द शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरिक्षक हेमंत पाटील यांना मुंबई-आग्रा महामार्गावरुन अवैधरित्या वाहने वाहनातून कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा महामार्गावर टोलनाक्यानजीक पथकाने सापळा लावला. त्यावेळी इंदूरकडून धुळ्याकडे टाटा 407 (क्र.एम.पी.13 जीबी-0304) हे वाहन जात असतांना आढळून आले.

पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात दोन गोर्‍हे आणि 12 गायी असे 14 जनावरे जागा नसतांना कोंबून घेवून जात असतांना आढळून आले.

याबाबत वाहन चालकाला विचारले आता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सदर जनावरेही अवैधरित्या कत्तलीसाठी नेत असल्याचे उघड झाले.

या ठिकाणाहून पाच लाखांचे 407 वाहन आणि 86 हजार रुपये किमतीचे जनावरे असा पाच लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत वाहन चालक हबीब भुरा कुरेशी याच्या विरुध्द महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (अ), 5 (ब) चे उल्लंघन, 9 व प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधक करण्याबाबतचा अधिनियम सन 1960 चे कलम 11 (घ), 11 (च) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी पकडलेले जनावरे देखभाल व संगोपन करण्यासाठी राधेकृष्ण फाऊंडेशन संचलित माँ गायत्री गोशाळा, खर्दे बुद्रुक येथे दाखल करण्यात आले. शिरपूर पोलीसांनी ईदच्या अगोदर ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या