Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरशिर्डीत विवाहितेची आत्महत्या

शिर्डीत विवाहितेची आत्महत्या

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरातील आपल्या मुलीला प्रियकराबरोबर पळून जाण्यासाठी मदत केली. माझ्या मुलीचा तपास लागला पाहिजे नाहीतर तुला व तुझ्या मुलीला व पतीला सोडणार नाही अशी धमकी दिल्याने एका विवाहितेने रोगर नावाचे विष प्राशन करुन आत्महत्या केली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सविता सोमनाथ गायकवाड ही पती व दोन मुलींसह चौधरी वस्ती येथे 3 वर्षापासून राहत होती. मुलगी बेपत्ता आहे अशी तक्रार श्री. चौधरी यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. ती पळुन जात असताना त्या प्रकरणात सविता गायकवाड हिच्या मोबाईलचा वापर झाला होता, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. या आरोपावरून भाडेकरू असलेल्या सविता सोमनाथ गायकवाड या महिलेला शिवीगाळ करून जे मारण्याची धमकी दिल्याने तीस वर्षीय महिला सविता सोमनाथ गायकवाड (वय 33) हिने राहाताजवळ प्रवासात असताना रोगर नावाचे विष प्राशन करुन आत्महत्या केली.

याप्रकरणी महिलेच्या पती सोमनाथ मल्हारी गायकवाड (वय 42) रा. आंबी, ता. राहुरी सध्या रा. नादुर्खी याने शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी विनायक सोपानराव चौधरी (रा. नादुर्खी) व रिक्षा चालक रवि पवार (रा. शिर्डी) या दोघांच्या विरोधात भादंवि 306, 504, 506 व अनुसूचित जाती जमाती अन्वये 3/(2)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास प्रभारी उपविभागीय अधिकारी राहुल मदने हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या