Thursday, April 25, 2024
Homeनगरयंदाही शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने

यंदाही शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने

शिर्डी (राजकुमार जाधव)

लिंबाखाली प्रकट झाला, लिंबाखाली प्रकट झाला ऐसा साईनाथ माझा लिंबाखाली प्रकट झाला या सुंदर गाण्याच्या पक्तीने जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या साईबाबांच्या पवित्र नगरीत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला साईबाबा संस्थानच्या वतीने अगदी साध्या पध्दतीने भक्तांंविना प्रारंभ होत आहे.

- Advertisement -

कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने अद्यापही साईमंदीर सुरू करण्यासाठी परवानगी दिली नाही. मागील वर्षी देखील करोनामुळे साईमंदीर बंद होते तेव्हाही अशाप्रकारे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला होता. साईबाबा संस्थानच्या वर्षातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला जगभरातील भाविक साईदरबारी हजेरी लावतात. मात्र कोविडमुळे दोन उत्सवाला करोडो भाविकांसह शिर्डीकरांना मुकावे लागले असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शिर्डीतील रुतलेला अर्थकारणाचा गाडा पुर्वपदावर येण्यासाठी साईमंदीराची दारे खुले करावे अशी मागणी ग्रामस्थ आणी व्यावसायिक करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या