Sunday, May 5, 2024
Homeनगरशिर्डी साई मंदिरात दर्शनासाठी जायचंय, मग ‘हे’ नियम वाचा

शिर्डी साई मंदिरात दर्शनासाठी जायचंय, मग ‘हे’ नियम वाचा

शिर्डी | प्रतिनिधी

राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ पासून महाराष्‍ट्रातील (maharashtra) सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले (Religious places open in maharashtra) करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. त्‍यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात (shri Saibaba Samadhi Mandir) दररोज १५ हजार साईभक्‍तांना (sai devotees) दर्शनाचा लाभ दिला जाणार असून…

- Advertisement -

१० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व आजारी व्‍यक्‍ती तसेच मास्‍क न वापरणा-या साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत (CEO Bhagnyashree Banayat) यांनी दिली. (guidelines for sai darshan)

श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या करोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. दिनांक २४ सप्‍टेंबर २०२१ रोजी राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ पासून घट स्‍थापनाच्‍या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत.

दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ रोजीच्‍या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्‍यात येणार असून सकाळी ०६.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत मंदिर खुले राहणार असून दिवसभरात १५ हजार भाविकांना दर्शनाकरीता प्रवेश दिला जाईल. यापैकी १० हजार ऑनलाईन पास (०५ हजार सशुल्‍क व ०५ हजार निशुल्‍क), व ०५ हजार निशुल्‍क व सशुल्‍क ऑफलाईन पासेस असतील. प्रत्‍येक तासाला ११५० साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल

- Advertisment -

ताज्या बातम्या