Thursday, April 25, 2024
Homeनगरशिर्डी पोलीस ठाण्यातील भंगार विक्री 8 लाख 52 हजाराचा लिलाव दाखवला 2...

शिर्डी पोलीस ठाण्यातील भंगार विक्री 8 लाख 52 हजाराचा लिलाव दाखवला 2 लाख 50 हजारात

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत बेवारस स्थितीत आढळून आलेल्या मोटारसायकल लिलावाची अंतीम बोली आठ लाख बावन्न हजाराची असताना शासकीय कोषागारात दोन लाख पन्नास हजाराचाच भरणा झाल्याने शासनाची सहा लाख दोन हजाराची फसवणूक झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश भोंगळ यांनी केला असून या लिलावाची चौकशी करुन संबधित दोषी अधिकार्‍यावत गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी पोलीस महासचांलकाकडे केली आहे.

- Advertisement -

राज्य पोलीस महासंचालक यांना पाठवलेल्या तक्रार अर्जात भोंगळ यांनी म्हटले आहे, शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत बेवारस स्थितीत आढळून आलेल्या 85 मोटारसायकलचा जाहीर लिलाव 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जुन्या शिर्डी पोलीस स्टेशन हॉलमध्ये करण्यात आला. लिलावात 87 भंगार लायसन्स धारकांनी सहभाग घेत डिपॉझिट म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये रोख जमा केली. हॉलमध्ये जाण्यापूर्वी पोलिसांनी सर्व लिलाव धारकांचे मोबाईल सायलंट मोडवर ठेवण्याचे सांगत सर्व मोबाईल जमा करून एका कोपर्‍यात ठेवण्यात आले.

सरकारी किंमत दोन लाखाच्या पुढे ठेवुन बोली बोलण्यास सुरुवात झाली. बोली वाढत वाढत जावुन रिजवान पठाण यांनी आठ लाख एक्कावन्न हजार केले तर अंतिम बोली निहाल शेख यांनी आठ लाख बावन्न हजाराला करत तीन वार होवून श्री. शेख यांना वरील रकमेला लिलाव देण्यात आला. त्या लिलावात सामाजिक कार्यकर्ते रमेश भोंगळ हे पठाण यांच्याबरोबर प्रत्यक्ष हजर होते.

ओपन जाहीर लिलाव असताना एवढी गोपनीयता पाळण्याचे कारण काय? असा संशय भोंगळ यांना आल्याने त्यांनी 26 ऑगस्ट रोजी शिर्डी पोलीस स्टेशनला माहिती अधिकार अधिनियमाद्वारे अर्ज केला. 2 सप्टेंबरला रजिस्टर पोहच माहितीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यात अंतिम बोली केवळ दोन लाख पन्नास हजार रुपयांचा भरणा शासकीय कोषागारात केल्याचे आढळून आल्याने. शासकीय सहा लाख दोन हजाराचा अपहार झालयचे लक्षात आले. त्यामुळे या लिलावाची चौकशी करुन संबधित दोषी अधिकार्‍यावर शासकीय रकमेचा अपहार व फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी पोलीस महा सचांलकाकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या