Saturday, April 27, 2024
Homeनगरशिर्डी-नागपूर समृद्धी मार्ग 15 ऑगस्टपासून खुला

शिर्डी-नागपूर समृद्धी मार्ग 15 ऑगस्टपासून खुला

मुंबई | Mumbai

गेल्या काही काळापासून लोकार्पणाचे काही मुहूर्त टळलेला समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते नागपूर हा टप्पा 15 ऑगस्टपासून वाहतूकीसाठी खुला होईल, अशी शक्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महत्त्वकांक्षी ठरलेला समृद्धी महामार्ग वाहनांसाठी कधी सुरू होणार, याकडे राज्याचे लक्ष आहे. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. 15 ऑगस्टपासून शिर्डी ते नागपूर हा टप्पा वाहनधारकांसाठी खुला होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान मुंबईतील रस्ते पुढील दोन वर्षात सिमेंटचे करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच आपण आयुक्तांना सांगितलं मुंबईत खड्डे दिसले नाही पाहिजे, त्यावर त्यांनी देखील आपण घोड्या सारखं काम करतो, असं म्हटल्याची मिश्किल टिप्पणी शिंदे यांनी केली.

पश्चिमेच्या पाण्यासाठी कर्जहमी

समुद्रात जाणारे पश्चिमेचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी सरकार काम करणार आहे. अशा विकास प्रकल्पांसाठी 60 हजार कोटींच्या कर्जास हमी देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षापासून समुद्रात वाहून जाणारे सह्याद्री खोर्‍यातील पाणी वळविण्याची मागणी आहे. त्यास शिंदे सरकारच्या काळात वेग मिळण्याची अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या