Thursday, April 25, 2024
Homeनगरशिर्डी नगरपंचायत स्वच्छता कर्मचार्‍यांचे पगार 2 महिन्यांपासून थकले

शिर्डी नगरपंचायत स्वच्छता कर्मचार्‍यांचे पगार 2 महिन्यांपासून थकले

शिर्डी |शहर प्रतिनिधी|Shirdi

शिर्डी नगरपंचायतचा शहर स्वच्छतेपोटी बीव्हीजी कंपनीला देण्यात येणारा दरमहा 42 लाख 50 हजार रुपयांचा ठेका नोव्हेंबर 2020 पासून करारानुसार पुर्ववत करण्यात आला आहे.

- Advertisement -

मात्र मागील दोन महिन्यांपासून कंपनीने नगरपंचायतच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचे पगार थकवल्याने त्यांच्या कुटुंबावर पुन्हा उपासमारीची वेळ उदभवली आहे. ठेकेदार थकीत रकमेसाठी नगरपंचायत प्रशासनाकडे बोट दाखवतो तर नगरपंचायत साई संस्थानकडे यामध्ये स्वच्छता कर्मचारी नाहक भरडला जात आहे.

जागतिक किर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डी शहरात वर्षाकाठी साडेतीन करोडपेक्षा जास्त भाविक साईसमाधीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात त्यामुळे शहरात कचरा साचण्याचे प्रमाण मोठे आहे. साचलेल्या ओल्या व सुक्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी साईबाबा संस्थांनच्या माध्यमातून डिसेंबर 2017 पासून शिर्डी नगरपंचायतीस स्वच्छतेपोटी 42 लाख 50 हजार रुपयांचा ठेका देण्यात आला आहे.

दरम्यानच्या काळात सदरील ठेक्याची रक्कम नगरपंचायतने कमी केली होती. मात्र नोव्हेंबर 2020 पासून पुन्हा करारनाम्याप्रमाणे पूर्ववत करण्यात आली असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर साईमंदिर बंद असल्याने स्वच्छतेपोटी शिर्डी नगरपंचायतीस साईसंस्थान प्रशासनाकडून देण्यात येणारी दरमहा 42 लाख 50 हजार रुपये रक्कम बंद केली तरीदेखील नगरपंचायतने ठेकेदाराकडून वेळोवेळी शहरात स्वच्छता ठेवून करोनाचा प्रसार रोखण्यास मदत मिळाली आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे स्वच्छता कर्मचार्‍यांचे पगार ठेकेदाराने थकवले असून या कर्मचार्‍यांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वारंवार पगार थकवत असल्याने कर्मचारी वर्ग संभ्रमात पडला असून काम सोडावे की धरावे असा बिकट प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. शिर्डी नगरपंचायत प्रशासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर संबंधित ठेकेदार वेळेवर पगार करेल, अशी अपेक्षा कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या