Friday, April 26, 2024
Homeनगरशिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसला मिळण्याकरिता श्रेष्ठींकडे आग्रह धरणार

शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसला मिळण्याकरिता श्रेष्ठींकडे आग्रह धरणार

शिर्डी|प्रतिनिधी|Shirdi

शिर्डी लोकसभा ही जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे मागणी करणार असून येणार्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेस नक्कीच विजय संपादन करेल ,असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

अ.नगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या उपस्थितीत हॉटेल साई छत्र शिर्डी येथे संपन्न झाली.

यावेळी डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे म्हणाले, यापुढील काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका महानगरपालिका, लोकसभा विधानसभा या सर्व निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती विभागातील कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍यांना योग्य ती संधी दिली जाईल कोणालाही वार्‍यावर सोडलं जाणार नाही.

यावेळी पदाधिकार्‍यांच्या मागणीला उत्तर देताना ते म्हणाले, शिर्डी लोकसभा ही जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे.आणि ती मिळवण्यासाठी मी राष्ट्रीय काँग्रेस कडे मागणी करेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विजय निश्चित आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे आपल्या प्रास्ताविकात खासदार राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी येणार्‍या 2024 च्या निवडणुकीमध्ये मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी करण्यास इच्छुक आहे. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांचेही भाषण झाले यावेळी प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका रणपिसे यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना की शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जागा ही बौद्धांनाच मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्याकडे मागणी केली.औरंगाबाद काँग्रेसचे प्रवक्ते डॉ.पवन डोंगरे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी बंटी यादव यांनी केले तर कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल व जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष गायकवाड यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या