Friday, April 26, 2024
Homeनगरअत्याचार प्रकरणी आणखी एक अटकेत

अत्याचार प्रकरणी आणखी एक अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्नेहालय संस्थेतून निघून गेलेल्या तरूणीवर शिर्डी येथे हॉटेलवर कामाला असलेल्या तरूणांनी अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. या प्रकरणी आणखी एकाला अटक केली असून एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. उमेश भागचंद राठोड (वय 19), जितेंद्र रमेश चव्हाण (वय 21), लखन अरूण गोसावी (वय 23) व एक अल्पवयीन (सर्व रा. कुंभारी खुर्द ता. जामनेर, जि. जळगाव) अशी त्यांची नावे आहेत.

- Advertisement -

2002 शासन निर्णयात शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची तरतूद

येथील स्नेहालय संस्थेत राहत असलेली तरूणी 14 जुलै 2022 रोजी निघून गेली. त्यानंतर ती शिर्डी मंदिर परिसरात एकटीच राहत होती. शिर्डी येथे हॉटेलमध्ये काम करणार्‍या तरूणांनी त्या तरूणीवर अत्याचार केला होता. पीडिताने दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्ष्यात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी शिर्डी येथील घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला.

जिल्ह्यात हुडहुडी !

सुरूवातीला दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून आणखी दोघांची नावे समोर आले. तिघांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई अधीक्षक ओला, अप्पर अधीक्षक खैरे, उपअधीक्षक पाटील, शिर्डीचे उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुलाबराव पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आठरे, सहाय्यक निरीक्षक संभाजी पाटील, महिला सहाय्यक निरीक्षक पल्लवी उबरहंडे, उपनिरीक्षक दीपक पाठक, उपनिरीक्षक योगेश चाहेर, उपनिरीक्षक माळी, पोलीस अंमलदार विजय नवले, मच्छिंद्र पांढरकर, संदीप चव्हाण, किशोर जाधव, जयसिंग शिंदे, संदीप गडाख, नितीन शेलार, अजय अंधारे, राणी वरघुडे, मैना माळी, सुलभा औटी यांच्या पथकाने केली.

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘चाणक्य विष्णूगुप्त’

- Advertisment -

ताज्या बातम्या