Wednesday, May 8, 2024
Homeनगरशिर्डी पूरस्थितीची आ. विखे यांच्याकडून पाहणी

शिर्डी पूरस्थितीची आ. विखे यांच्याकडून पाहणी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरातील श्रीरामनगर, पुनमनगर, हेडगेवार नगरमध्ये काकडी, कोर्‍हाळे, नांदुर्खी येथून वाहून आलेले पाणी

- Advertisement -

मोठ्या प्रमाणावर साचले असून आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करून नगरपंचायत प्रशासनाला सदरील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने सूचना केल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

शुक्रवार दि.18 सप्टेंबर रोजी सकाळी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरात जुन्या लेंडीनाल्याला आलेल्या पुरामुळे श्रीरामनगर, पुनमनगर, हेडगेवारनगरमध्ये जाऊन पाहणी करत येथील रहिवाशांचे प्रश्न जाणून घेतले.

यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, संस्थानचे बांधकाम विभाग खातेप्रमुख रघुनाथ आहेर, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, शिवाजी गोंदकर, अभय शेळके, सुजित गोंदकर, पोपट शिंदे,

रवींद्र गोंदकर, महेश लोढा, ज्ञानेश्वर गोंदकर, साईनिर्माण करिअर अ‍ॅकॅडमीचे संचालक ताराचंद कोते, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीचे संचालक प्रताप कोते, भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष साईराज कोते, गणेशचे संचालक मधुकर कोते, गणेश कोते, सुधीर शिंदे, रमेश कोते, गफ्फारखान पठाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

आ. विखे पाटील यांनी सांगितले की, यावर्षी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे सदरचे पाणी शहरात येऊन पोहचले आहे. जुन्या काळात पाणी जाण्यासाठी शिर्डी शहरामध्ये पाटबंधारे विभागाच्या चार्‍या तसेच लेंडी नाल्यावर साईबाबा संस्थानने आणि काही ग्रामस्थांनी अतिक्रमण करून इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे सदरचे पाणी मार्ग प्रवाह मिळेल त्या जागी शिरकाव करत आहे.

यावेळी आ. विखे पाटील यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी याप्रश्नी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या