Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरशिर्डीसाठी अजमेर, तिरुपती तीन नव्या रेल्वे सुरू

शिर्डीसाठी अजमेर, तिरुपती तीन नव्या रेल्वे सुरू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये 23 मार्चपासून बंद केलेली रेल्वेसेवा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे.

- Advertisement -

त्यानुसार 5 डिसेंबरपासून दक्षिण मध्य रेल्वेच्यावतीने धार्मिक स्थळांना जोडणार्‍या रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. जगप्रसिद्ध अजमेर भाविकांसाठी हैदराबाद-जयपूर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस 5 डिसेंबरपासून, तर दक्षिण भारतातील भाविकांचा शिर्डीकडील ओढा लक्षात घेता सुरू केलेल्या द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस शिर्डी-सिकंदराबाद-शिर्डी व काकिनाडा-शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

तसेच अमरावती-तिरुपती विशेष गाडीला मुदतवाढ देण्यात आली असून वेळेत बदल करण्यात आला आहे. हैदराबाद-जयपूर ही साप्ताहिक विशेष गाडी औरंगाबाद मार्गे शनिवार दि. 5 डिसेंबरपासून दर शनिवारी हैदराबाद रेल्वेस्थानकावरून दुपारी 3.10 वा. सुटेल आणि नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे जयपूर येथे सकाळी 5.25 वा. पोहोचेल. परतीच्या प्रवासात जयपूर-हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडी औरंगाबाद मार्गे 8 डिसेंबरपासून दर मंगळवारी जयपूर रेल्वे स्थानकावरून दु. 3.20 वा. सुटेल. मनमाड, औरंगाबाद, नांदेड मार्गे हैदराबाद येथे सकाळी 7.30 वा. पोहोचेल.

तिरुपती ते अमरावती द्विसाप्ताहिक उत्सव गाडी तिरुपती-अमरावती द्विसाप्ताहिक उत्सव विशेष गाडी तिरुपती येथून दर मंगळवारी व शनिवारी सुटेल. या गाडीला 1 ते 29 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी 1 डिसेंबरपासून बदललेल्या वेळेप्रमाणे धावत आहे. तिरुपती येथून दुपारी 3.40 वा. सुटेल व काचीगुडा येथे सकाळी 4 वा. पोहोचेल.निझामाबादला सकाळी 6.50 वा., नांदेडला 8.51 वा, पूर्णा येथे 9.40, अकोल्याला दुपारी 1.45 वा. व अमरावती येथे दुपारी 3.10 वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात अमरावती ते तिरुपती द्विसाप्ताहिक उत्सव विशेष गाडी अमरावतीहून दर सोमवारी व गुरुवारी सुटेल. या गाडीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी 3 डिसेंबरपासून अमरावती येथून बदललेल्या वेळेनुसार सकाळी 6.45 वा., अकोल्याला 8.20 वा., पूर्णा 11.50, नांदेडला दुपारी 12.25, निझामाबादला 2.25 काचीगुडाला सायंकाळी 5.50 तर तिरुपती येथे दुसर्‍या दिवशी स. 6.25 वा. पोहोचेल.

शिर्डीसाठी तीन रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक सिकंदराबाद-श्री साईनगर शिर्डी (07002) द्विसाप्ताहिक विशेष गाडी 4 डिसेंबरपासून सिकंदराबादहून दर शुक्रवार, रविवारी दु. 4.45 वा. सुटेल. विकाराबाद, उदगीर, परळी, परभणी, औरंगाबाद, नगरसोल मार्गे शिर्डीला स. 9.10 वा. पोहोचेल. शिर्डी-सिकंदराबाद (07001) ही विशेष गाडी शिर्डीहून दर शनिवारी व सोमवारी सायं. 5.20 वा. सुटेल. औरंगाबाद, परभणी, परळी, उदगीर मार्गे सिकंदराबादला स. 8.55 वा. पोहोचेल.

काकिनाडा- शिर्डी (07206) ही विशेष रेल्वे काकिनाडाहून सोमवारी बुधवार, शनिवारी स. 6 वा. सुटेल. राजमुंद्री, विजयवाडा, सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबादमार्गे शिर्डीला स. 9.10 वा. पोहोचेल. परतीच्या प्रवासात शिर्डी-काकिनाडा (07205) ही विशेष गाडी शिर्डीहून दर मंगळवार, गुरुवारी आणि रविवारी सायं. 5.20 वाजता सुटेल. ती औरंगाबाद, परभणी, सिकंदराबाद, विजयवाडा मार्गे काकिनाडा येथे रात्री 7.45 वा. पोहोचणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या