गणेशभक्तांसाठी गुड न्यूज! शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठी घोषणा

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

यंदा ३१ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन होत असून याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना – भाजप युतीच्या (Shiv Sena-BJP alliance) सरकारने गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) कोकणात (kokan) जाणाऱ्या वाहनांसाठी मोठी घोषणा केली आहे…

शिंदे सरकारने (Shinde Government) गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा (Mumbai-Goa) आणि मुंबई-बंगळुरु (Mumbai Bangalore) महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना २७ ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत टोलमाफी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत गणेशोत्सवानिमित्त २० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२२ या कालावधीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना (vehicles) टोलमधून सूट मिळावी यासाठी परिवहन विभागाने (Transport Department) टोल पास जारी करावेत, असे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी वाहनांची कागदपत्रे सादर केल्यावर त्यांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *