Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘शिक्षण सेतू’ अभियानाचा १५ जूनपासून श्रीगणेशा

‘शिक्षण सेतू’ अभियानाचा १५ जूनपासून श्रीगणेशा

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटात आदिवासी पाडयावरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने ‘शिक्षण सेतू अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जूनपासून या अभियानाची संपूर्ण राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी केली जाणार आहे…

- Advertisement -

त्यासाठी ८ सदस्यीय कार्य समिती गठीत केली अाहे. या समितीचे अध्यक्ष आदिवासी विकास आयुक्त असणार आहे. कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि पोषण आहारात खंड पडू नये, यासाठी या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सेतू अभियान सुरु करत त्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे.

या अभियानातून अभ्यासाच्या अर्थात शैक्षणिक साहित्यासह इतर भौतिक बाबी हे थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. शिक्षक गावात, पाड्यावर जाऊन हे साहित्य विद्यार्थ्यांना देणार.

शिक्षणही देणार आहेत. तर जेथे शिक्षणकांद्वारे सेवा देता येणार नाही, अशा ठिकाणी शिक्षणमित्र ही जबाबदारी पार पाडतील. शक्य तेथे ऑनलाईन पध्दतीने शिक्षण, जेथे शक्य नाही तेथे गावात शिक्षण, लगतच्या पाड्यांचाही गावाच्या मुख्य शाळांना जोडण्यात येईल. शिवाय पोषण आहारही विद्यार्थ्यांना दिला जाईल.

त्यामुळे विद्यार्थी आपल्याच गावी, शेजारच्या गावी शिक्षण घेऊन आपला अभ्यास पूर्ण करु शकतील. तसेच विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे अनुदान देखील वितरीत केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या