Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedजम्मू-काश्मीर निवडणुकीत शिकारा रॅली

जम्मू-काश्मीर निवडणुकीत शिकारा रॅली

जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवून केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आल्यानंतर प्रथमच २० जिल्हा विकास परिषदेच्या निवडणूक होत आहे. २८ नोव्हेंबरपासून आठ टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकीचे मतदान पुर्ण झाले. आता २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

वाल्मिकी, गुरखांनी प्रथमच केले मतदान

- Advertisement -

जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) शनिवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत पश्चिम पाकिस्तान निर्वासितांना तब्बल ७० वर्षांनी मतदानाचा अधिकार बजावता आला. केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्याने या निर्वासितांसह वाल्मिकी तसेच गुरखा यांसारखे समाज स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यास पात्र ठरले आहेत. याशिवाय ते निवडणुका देखील लढवू शकतात. लोकसभा निवडणुका वगळता, या निर्वासितांना गेल्या वर्षीपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा, पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान करण्यास बंदी होती.

जम्मू मधील १० तर काश्मीर मधील १० जागांचा समावेश आहे. जिल्हा विकास परिषदेत १४ मतदारसंघ असतील. डीडीसी आणि पंचायत पोटनिवडणुकीसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. तर नगरपालिका पोटनिवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (ईव्हीएम) पार पडेल. जिल्हा विकास परिषद निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होणार आहेत मात्र पोटनिवडणुकीत पक्षाच्या चिन्हांचा वापर होणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या