Saturday, April 27, 2024
Homeनगरशेवगावला 50 हजाराची लाच घेताना लिपिक जाळ्यात

शेवगावला 50 हजाराची लाच घेताना लिपिक जाळ्यात

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

शेवगाव तहसिलदार कार्यालयातील (Shevgav Tahsil Office) गौण खनिज विभागातील (Subordinate Minerals Department) एका लिपिकाला (Clerk) पन्नास हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Nashik Anti-Corruption Department) पथकाने आज दुपारी रंगेहात पकडले आहे. यामुळे जिल्ह्याभरातील महसूल विभागात (Department of Revenue) खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

या तालुक्यात विषारी दारूमुळे चार दिवसात दोनजणांचा बळी

हरेश्वर सानप असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. अवैध वाळू प्रकरणी (Illegal Sand Case) दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच या पुढे वाळू वाहतुकीस मदत (Sand Transport Help) करण्यासाठी वाळू ठेकेदाराकडून (Sand Contractor) 1 लाख रूपयांची मागणी (Demand) केली होती. यातील 50 हजार रूपयांची लाचेची (Bribe) रक्कम घेताना शेवगावच्या तहसिल कार्यालय आवारातच नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Nashik Anti-Corruption Department) पथकाने सापळा रचून त्यास रंगेहाथ पकडले आहे. पुढील कारवाई सुरु असून सानप याने ही रक्कम कोनासाठी आणि किती घेतली याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत.

जायकवाडीतून 30435 क्युसेकने विसर्ग

शेवगाव तहसील कार्यलयातील गौण खनिजचा कारभार पाहणारे कर्मचारी हप्ते देऊनही नाहक त्रास देत असल्याने वाळू व्यावसायत उतरलेल्या युवकांनी त्यांना पकडून देण्याचा निर्धार करून नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ठरल्यानुसार लाचेच्या रकमेपैकी 50 हजार रुपये स्वीकारताना तहसिलदार कार्यालयाच्या आवारात लिपिकाला पकडण्यात आले.

या कारवाईनंतर महसुल खात्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी नॉटरिचेबल झाले आहेत. तर हा लिपिक कोणत्या अधिकार्‍यासाठी ही लाच घेत होता. यााचा शोध सुरू आहे. त्यातील अनेकांचे यंत्रणेशी अर्थपूर्ण संबंध आहेत. पुढचा नंबर कोणाचा यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या मागदर्शनाखाली उपअधिक्षक पाटील व त्यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या