Friday, April 26, 2024
Homeनगरशेवगाव-पाथर्डी नगरपरिषदांना पाच कोटींचा निधी

शेवगाव-पाथर्डी नगरपरिषदांना पाच कोटींचा निधी

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

नवनिर्वाचित राज्य शासनाने सत्तेवर येताच शेवगाव नगरपरिषद व पाथर्डी नगरपरिषद अंतर्गत विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

- Advertisement -

नगरविकास विभागाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत शेवगाव नगरपरिषद करिता 2 कोटी 60 लक्ष तर पाथर्डी नगरपरिषद करिता 2 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 7 जुलै 2022 रोजीचे शासन निर्णया नुसार शेवगाव नगरपरिषद अंतर्गत दहावा घाट बांधणे कामाकरिता 1 कोटी रुपये, शेवगाव नगरपरिषद अंतर्गत आखेगाव रोड ते कोरडे वस्ती ते डोईफोडे वस्ती रस्ता करणे कामाकरिता 80 लाख तर शेवगाव नगरपरिषद अंतर्गत नेवासा रोड (बॉम्बे मशनरी समोर) ते लांडे वस्ती ते बडे वस्ती रस्ता करणे कामाकरिता 80 लाख रुपये याप्रमाणे 2 कोटी 60 लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

पाथर्डी नगरपरिषद करिता पाथर्डी नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीतील फर्निचर व विद्युत कामे (इलेक्ट्रिफीकेशन) करणे कामाकरिता 2 कोटी रुपये तर आनंदनगर येथील फळे घर ते ओढा बंदिस्त गटार करणे कामाकरिता 40 लाख रुपये याप्रमाणे 2 कोटी 40 लाख रुपयांच्या कामांना निधी मंजूर केला असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शेवगाव नगरपरिषद व पाथर्डी नगरपरिषद अंतर्गतील कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. सदर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मोनिका राजळे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

अनुशेष भरून काढू

मागील भाजप शिवसेना युती शासनाच्या कार्यकाळात मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली. परंतु महाविकास आघाडी शासन काळात विकास कामांना निधी मिळत नव्हता. परंतु यापुढील काळामध्ये मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असून विविध विकास कामांसाठी आपला शासनाकडे पाठपुरावा चालू असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या