Friday, April 26, 2024
Homeनगरपूरग्रस्तांना केंद्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ देणार - खा . डॉ. विखे

पूरग्रस्तांना केंद्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ देणार – खा . डॉ. विखे

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव (Shevgav) तसेच पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील अतिवृष्टी (Heavy Rain), पूरग्रस्तांना (Flood victims) केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन खासदार डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe) यांनी येथे दिले.

- Advertisement -

खासदार डॉ.सुजय विखे (MP Dr. Sujay Vikhe) यानी तालुक्यातील आखेगाव, वरूर, भगूर, वडुले येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शासकीय अधिकार्‍यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तालुक्याचा सविस्तर अहवाल प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नुकसान झालेल्या शेतकर्‍यांशी तसेच पूरग्रस्त (Flood victims) भागातील स्थलांतरित नागरिकांशी चर्चा करून त्यांना दिलासा दिला.

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नंदिनी, ढोरा, चांदणी नद्यांना आलेल्या पुराने तालुक्यातील आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, वडुले बु, जोहरापूर नजीकच्या लांडे वस्ती मधील अनेक नागरिक पुरात अडकून पडले होते. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल व एनडीआरएफ पथकाला तातडीने पाचारण करून संकटात सापडलेल्या नागरिकांना पुरातून बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale), माजी आमदार चंद्रशेखर घुले (Former MLA Chandrasekhar Ghule), पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितीज घुले (Speaker Dr. Kshitij Ghule) यांनी जिल्हाधिकार्‍यांशी तातडीने संपर्क करून तालुक्यातील पूर परिस्थितीची माहिती देऊन मदतकार्य सुरू करण्याबाबत त्यांचे लक्ष वेधले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (ZP CEO Rajendra Kshirsagar) यांच्यासह पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या गावांना भेटी देऊन प्रशासकीय पातळीवरून मदतकार्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.

तर दुसरीकडे संकटात सापडलेल्या नागरिक, शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी प्रशासनाबरोबर ग्रामस्थही सरसावले आहेत . पुराच्या पाण्यातून माणसे तसेच जनावरांची सुटका करणे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करणे यासाठी शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ पुढे आले आहेत. जनशक्ती मंचचे संस्थापक अ‍ॅड.शिवाजीराव काकडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माजी सभापती अरुण लांडे, वरूर येथील सुनील मारुती म्हस्के यांनी अन्न पाकिटे व जेवणाची व्यवस्था केली.

तसेच पूरग्रस्त गावात सभापती डॉ.घुले यांनी अन्न पाकिटे पोहचती केली. जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने पूरग्रस्तांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. हनुमान गणेश मंडळातील भगवान धूत, राहुल बंब, संजय फडके, अशोक आहुजा, बापू धनवडे, राहुल बंब, दीपक आहुजा, किरण डहाळे, अभिषेक देहाडराय आदींनी अडकून पडलेल्या प्रवाशांना जेवण तसेच नाष्ट्याची व्यवस्था केली. दरम्यान जि.प. सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी जनशक्ती विकास आघाडीच्यावतीने तहसीलदार अर्चना भाकड यांना निवेदन देऊन अतिवृष्टीमुळे काही गावात पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी केली. यावेळी जगन्नाथ गावडे, राजेंद्र पोटफोडे , सरपंच वैभव पूरनाळे, दादासाहेब पूरनाळे, राजेंद्र गरुड आदी उपस्थित होते.

पुरात वडुलेतील नागरिकाचा मृत्यू

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तालुक्यातील वडुले बुद्रुक येथील मुरलीधर आनंदराव सागडे (वय 60) यांचा मृतदेह गावा नजीकच्या हरवणे वस्ती शिवारात बुधवारी मिळून आला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या