Friday, April 26, 2024
Homeनगरशेवगाव नगरपरिषदेत अधिकारी व त्यांच्या काही हस्तकांचे घोटाळे

शेवगाव नगरपरिषदेत अधिकारी व त्यांच्या काही हस्तकांचे घोटाळे

शेवगाव |तालुका प्रतिनिधी/वार्ताहर| Shevgav

शेवगावमधील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेतील अधिकारी व त्यांचे काही हस्तक यांनी या काळात पदाचा गैरवापर करत

- Advertisement -

अनेक लहान मोठे घोटाळे केले आहेत. शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील काही प्रभागात निकृष्ठ पध्दतीने रस्त्याची व गटारांची कामे झाली व यामुळे बहुसंख्य ठिकाणी रस्ते हे एकाच पावसाने उखडले गेले व शहर सध्या खड्डेमय झाले आहेत आणि अंडर ग्राउंड गटारी या ब्लॉक होऊन पाणी रस्त्यावर जमा होत आहे.

याबाबत नगरपरिषदेकडे तक्रार केल्यास अधिकार्‍यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. शहरात आठ ते नऊ दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. या विषयात गांभीर्याने लक्ष घालून या सर्व त्रासातून नागरिकांची सुटका करावी ही विनंती असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. व निवेदन देण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले, युवक राष्ट्रवादीचे कृष्णा सातपुते, समीर शेख, संतोष जाधव, वहाब शेख, रोहित काथवटे, अमर जाधव, किरण भोकरे, रोहन साबळे, अभिजीत देशमुख, कृष्णा ढोरकुले, संकेत वांढेकर, प्रवीण भास्कर, दीपक कुसळकर, भैय्या गर्जे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या