Friday, April 26, 2024
Homeनगरशेवगाव बसस्थानकाचे काम रखडलेलेच

शेवगाव बसस्थानकाचे काम रखडलेलेच

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव आगाराच्या अद्ययावत बसस्थानकाचे काम गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून रखडलेलेच आहे. प्रवाशांना बसायला बाकडे नाही, चांगली जागा नाही, डोक्यावर शेड नाही. अशा स्थितीमुळे ऐन पवासाळ्यात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत.

- Advertisement -

शेवगाव येथील अद्ययावत बसस्थानकाचे भूमिपूजन सुमारे तीन वषार्र्ंपूर्वी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते भर पावसात पार पडले होते. त्यानंतर काही प्रमाणात बांधकामही सुरू झाले. यामुळे शेवगाव तालुक्यातील प्रवाशांना मोठी अशा लागली होती. मात्र गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून हे काम बंद आहे. रखडलेल्या या अद्यायावर बसस्थानकाच्या कामास कधी मुहूर्त मिळणार? याबाबत प्रवाशी वर्गांचे लक्ष लागले आहे. दरम्यान बसस्थानकाचे काम रखडल्याने सध्या प्रवाशांना ऐनपावसाळ्यात विविध अडचणींचा सामना करण्याची वेळ येत आहे.

बस पार्किंगसाठी परिसरात जागा नाही, डेपोतून आलेली बस नेमकी कोठे लागेल याची माहिती नसल्याने बस लागल्यानंतर पाठीमागे पळणारे प्रवाशी, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बसस्थानकाच्या परिसरात जागोजागी साचलेला चिखल व घाण पाणी, रात्रीच्यावेळी वीजपुरवठा कायम बंद राहत असल्याने निर्माण झालेले अंधाराचे साम्राज्य, काही जण उघड्यावर लघुशंका करीत असल्याने तयार झालेले डासांचे साम्राज्य अशा एक ना अनेक अडचणीमुळे शेवगावचे बसस्थानक प्रवाशांच्यादृष्टीने असून अडचण नसून खोळंबा या पद्धतीचे ठरत असल्याच्या तक्रारी आहेत. आल्याने याबाबत वरिष्ठ पातळीवरून दखल घेऊन जिल्ह्याला मराठवाड्याशी जोडणारे व सदासर्वकाळ प्रवाशांच्या गर्दीने फुललेल्या शेवगाव आगाराच्या रखडलेल्या बांधकामाला तातडीने गती मिळून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी प्रवाशी जनतेतून होत आहे.

आगार व्यवस्थापक नगरला अतिरिक्त

आगार व्यवस्थापक यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून नगर येथील अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क होत नाही. यामुळे किमसप येथे प्रवाशांना येणार्‍या अडचणींच्या तक्रारीबाबत नेमका कुणाशी संपर्क साधायचा याचा उलगडा होत नसल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या