शेवगाव तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या 10 जागांसाठी पोटनिवडणूक

jalgaon-digital
1 Min Read

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या एकूण 10 जागांसाठी होणार्‍या पोट निवडणुकीसाठी मंगळवार (दि.25) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असल्याची माहिती तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेतून देण्यात आली.

तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायतीच्या 5 तसेच भागवत एरंडगाव, जुनी खामपिंपरी, दहीगाव शे, अमरापूर व आव्हाणे खुर्द ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी अशा एकूण 6 ग्रामपंचायतींच्या 10 जागांसाठी पोट निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करणे, 3 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी, 8 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार असून 18 मे रोजी प्रत्यक्ष मतदान व 19 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

तालुक्यात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळी बरोबरच तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या 10 जागांसाठी पोटनिवडणूक होणार असल्याने वरील 6 गावांतील राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *