Friday, April 26, 2024
Homeनगरशेवगाव नगरपरिषद कार्यालयावरून उडी मारण्याचा कॉ. नांगरेंचा प्रयत्न

शेवगाव नगरपरिषद कार्यालयावरून उडी मारण्याचा कॉ. नांगरेंचा प्रयत्न

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव नगरपरिषदेतील कामगार कर्मचार्‍यांचे गेल्या तीन महिन्यांचे थकलेले पगार तातडीने अदा करण्यात यावेत. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य काउन्सीलचे सदस्य युवा कार्यकर्ते कॉ.संजय नांगरे यांनी पैठण रस्त्यावरील नगरपरिषद कार्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावर चढून तेथून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याशी आस्थापना विभाग अधिकारी बबन राठोड यांनी केलेल्या चर्चेनंतर कामगारांचे थकीत दोन पगार दि.25 जानेवारी पर्यंत देण्याचे मान्य केल्यानंतर कॉ.नांगरे यांनी पुकारलेले अभिनव आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मुख्याधिकार्‍यांनी आपला शब्द पाळला नाही तर कामगार पगाराबाबतचे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार कॉ.नांगरे व त्यांच्या मित्रमंडळाने जाहीर केला आहे.

शेवगाव नगरपरिषदेतील कामगार कर्मचार्‍यांचे तीन महिन्यांच्या थकीत पगाराबाबत वारंवार आंदोलन, मोर्चे, काम बंद आंदोलन पुकारूनही कामगारांच्या थकीत पगाराबाबतीत कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने कामगारावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. गुरूवारी कॉ. नांगरे यांनी अचानक नगर परिषदेच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारण्याचा निर्धार केला.यामुळे नगर परिषदेतील वेगवेगळ्या विभागाच्या अधिकार्‍यांची चांगलीच धांदल उडाली. यावेळी. कॉ.नांगरे यांच्या अभिनव आंदोलनास दत्तात्रय फुंदे, गणेश रांधवणे, विजय बोरुडे, राहुल सावंत, तुषार लांडे आदी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पाठबळ दिले. यावेळी नगर परिषदेचे कामगार कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या