Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याकानात हेडफोन घालून निघाला हळदीला; विहिरीत पडून मेंढपाळाचा मृत्यू

कानात हेडफोन घालून निघाला हळदीला; विहिरीत पडून मेंढपाळाचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी । nashik

येवला तालुक्यातील (yeola taluka) साताळी (Satali) येथे मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या एका मेंढपाळाचा (Shepherd) मोबाईल बघण्याच्या नादात विहिरीत पडून मृत्यू (Death by falling into a well) झाल्याची घटना घडली…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ त्र्यंबक गोर्डे (Somnath Trimbak Gorde) (वय ४२) रा. पिंपरी लोणी (प्रवरानगर) असे मृत मेंढपाळाचे नाव आहे. गेल्या महिन्यात गोर्डे कुटुंबीय येवला (yeola) तालुक्यातील चिचोंडी व साताळी (Chichondi and Satali) परिसरामध्ये वास्तव्यास आले होते. मयत सोमनाथ यांच्यासह काका मावशी व एक मजुर शेतात राहत होते.

साताळी येथील जगन्नाथ काळे यांच्या शेतात त्यांनी काल (दि २०) मेंढ्या बसविल्या होत्या. रात्री सात वाजेच्या सुमारास एका नातेवाईकाच्या हळदीच्या समारंभासाठी ते पायी शेतातून रस्त्यावर उभ्या मोटरसायकलकडे मोबाईल बघत आणि कानात हेडफोन लावून निघाले.

शेतातून जात असताना त्यांना कठडे नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने ते मोबाईलसह विहिरीत पडले. यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना लक्षात आली.

दरम्यान, घटनेची माहिती आज (दि २१) रोजी समजल्यानंतर विहिरीमध्ये डोकावून बघितले असता चप्पल व हेडफोन तरंगलेले दिसून आले. परिसरातील ग्रामस्थांनी गळ टाकून बघितले असता त्यांचा मृतदेह मिळून आला. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून येवला तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मधुकर उंबरे करत आहे. शोकाकुल वातावरणात मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या