Sunday, May 5, 2024
Homeनाशिकशेंद्रीपाडा ग्रामस्थांना मिळणार नवा पूल

शेंद्रीपाडा ग्रामस्थांना मिळणार नवा पूल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अतिवृष्टीमुळे ( Heavy Rain ) आलेल्या पुरामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील ( Trimbakeshwar Taluka ) दमणगंगा नदीवरील शेंद्रीपाडा ( shendripada ) येथील बहुचर्चित पूल वाहून गेल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हा प्रशासनाला तातडीने पूल उभारण्याचे फर्मान आले आहे.यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाकडून वाहून गेलेल्या पुलाच्या जागेवर आता नवीन पूल उभारण्याची तयारी सुरू केली आहे. सोमवार (दि.26) पर्यंत तेथे भरभक्कम नवीन लोखंडी पूल उभारला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

शेंद्रीपाडा येथे दमणगंगा नदी ( Damanganga River )ओलांडण्यासाठी महिलांना लाकडी बल्ल्यांवरून ये जा करावी लागत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाले होते. त्यावेळी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या व्हिडीओंची दखल घेऊन युवा सेनेच्या माध्यमातून तेथे पूल उभारण्याचा खर्च उचलला होता. तेव्हा जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या निधीतून 1175 किलो वजनाचा लोखंडी पूल उभारला. मात्र, त्याची रक्कम युवासेनेने दिली होती. त्या पुलाच्या बांधकामाचे श्रेय घेत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या पुलाची पाहणीही केली होती.

जुलैमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दमणगंगेच्या तासावरील तो पूल वाहून गेला. यावरून समाजमाध्यमांवर आदित्य ठाकरे व युवासेना यांच्यावर टीकाही झाली. त्याची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हाधिकार्‍यांनी त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज आदींनी शेंद्रीपाडा येथे जाऊन वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यांनी वाहून गेलेल्या पुलाचा शोध घेतला. दोन-तीन किलोमीटरच्या परिसरात त्याचा सांगाडाही सापडला नाही. त्यानंतर त्यांनी नवीन पुलाचे अंदाजपत्रक तयार करून त्याचे कामही संबंधित व्यावसायिकाला दिले आहे. याठिकाणी आता 1500 किलो वजनाचा पूल बनवला जाणार आहे. बांधकाम विभागाच्या मदतीने त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या