Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedगुरुपुष्यामृत योग ; शेगावात भाविकांची गर्दी

गुरुपुष्यामृत योग ; शेगावात भाविकांची गर्दी

शेगाव – प्रतिनिधी Shegaon

श्री संत गजानन महाराज मंदिरात (Shri Sant Gajanan Maharaj Temple) आज दि.२७ वार गुरुवार व गुरुपुष्यामूत योग आल्याने राज्यातील हजारो भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेऊन श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले आहे.

- Advertisement -

गुरुपुष्य योगावरी। जो याचे पारायण करी। बसून एका आसनावरी। राहुनिया शुचिर्भूत॥ त्याच्या अवघ्या मनोकामना। खचित होतील पूर्ण जाणा। कसल्याही असोत यातना। त्या त्याच्या निरसतील।

गुरुपुष्यामूत योग :- या वर्षीतील चार योग आले आहे. दि.३० मार्च २३ पहिल्या. योग दि.२७ एप्रिल २३ दुसरा योग दि.२५ मे २३तिसरा योग दि.२८ डिसेंबर २३ चौथ्या योग

श्री गजानन विजय ग्रंथ पारायणासाठी सर्वोत्तम मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुरुपुष्यामृत योग होय. गुरुपुष्यामृत योगावर हजारो भक्त एक दिवसीय पारायण करतात. आज गुरुवारी दि.२७ एप्रिल २३ रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. या वर्षांमध्ये खरे तर ४ गुरुपुष्यामृत योग आहेत. दि.२७ एप्रिल रोजीचे गुरुपुष्यामृत हे सर्वात जास्त कालावधीसाठी आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी सूर्योदयापर्यंत अर्थात २३ तासापेक्षा जास्त कालावधीसाठी गुरुपुष्यामृत योग असल्याने. श्रींच्या भाविकांनी २१ अध्याय विजय ग्रंथाचे पारायण केले तर काही भाविकांनी श्री गजानन प्रार्थना स्तोत्राचे पारायण केले तर श्री सत गजानन महाराज मंदिरात पारायण कक्ष मघ्ये हजारो भाविकांनी आज पारायण केले आहे. तर बाहेर गावाहून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींचे समाधी मदिराचे दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या