Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याठरलं! शशी थरुर लढवणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक

ठरलं! शशी थरुर लढवणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक

दिल्ली | Delhi

काँग्रेस (Congress) अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून (शनिवार) सुरु झाली आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसला आता गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळणार आहे.

- Advertisement -

दरम्यान शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी शनिवारी आपला प्रतिनिधी पाठवून उमेदवारी अर्ज मागवला आहे. या कालावधीत त्यांनी नामनिर्देशनपत्राच्या ५ संचांची मागणीही केली. त्यानंतर थरूरांच्या प्रतिनिधीला पाच संच देण्यात आले आहेत. त्यामुळं ते अध्यक्षपदाच्या रिंगणात असतील, हे स्पष्ट झालं आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. शशी थरुर हे जी २३ गटाच्या नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी २०२० मध्ये पक्षांतर्गत बाबींसदर्भात पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. ते पत्र माध्यमांना मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. आता शशी थरुर यांच्यापुढं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत याचं कडवं आव्हान असण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या