Monday, April 29, 2024
Homeनगरधारदार तलवारीसह तरुणास पोलिसांनी पकडले ; गुन्हा दाखल

धारदार तलवारीसह तरुणास पोलिसांनी पकडले ; गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील बजरंग चौकात धारदार तलवार घेऊन दहशत निर्माण करणार्‍या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. काल रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास बजरंग चौक परिसरातील हनुमान मंदिराजवळ मुश्तफा महंमद सय्यद (वय 24, रा.बजरंग चौक, श्रीरामपूर) हा हातात धारदार तलवार घेऊन आरडाओरडा करून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांना तातडीने घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले.

- Advertisement -

पोलीस कॉन्स्टेबल गौतम शंकर लगड यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन मुश्तफा महंमद सय्यद (वय 24, रा.बजरंग चौक, श्रीरामपूर) याच्याविरूद्ध भारतील हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक श्री. अडांगळे पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या