Friday, April 26, 2024
Homeनगरशेअर ट्रेडिंगमध्ये सहा लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये सहा लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेअर ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास दररोज दोन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सहा लाख तीन हजार 100 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 419, 420, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66 (डि) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अकोळनेर (ता. नगर) येथील रहिवाशी व सध्या रस्तापेठ, पुणे येथे वास्तव्यास असलेल्या महिलेने फिर्याद दिली आहे. 7 जानेवारी, 2020 ते 16 जुलै, 2022 दरम्यान ही घटना घडली असून 9 नोव्हेंबर, 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांना अज्ञात व्यक्तीने अनोळखी दोन मोबाईल क्रमांकावरून संपर्क केला. त्या व्यक्तीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. ऑनलाईन शेअर ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दररोज दोन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले.

फिर्यादीने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी 7 जानेवारी, 2020 ते 16 जुलै, 2022 दरम्यान संबंधित व्यक्तीच्या गुगल-पेवर एकूण सहा लाख तीन हजार 100 रुपये पाठविले. त्या व्यक्तीने फिर्यादी यांना दररोज दोन टक्के परतावा न देता त्यांचे पैसेही परत दिले नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या