Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकरोनाच्या नव्या रुपाचा फटका शेअरबाजारालाही, सेन्सेक्स १८०० अंकांनी कोसळला

करोनाच्या नव्या रुपाचा फटका शेअरबाजारालाही, सेन्सेक्स १८०० अंकांनी कोसळला

मुंबई । Mumbai

इंग्लंडमध्ये आढळलेला करोनाचा नवा प्रकार, जगभरात पुन्हा एकदा प्रवासावर येऊ घातलेली निर्बंधे, करोनाच्या लसीबाबत असलेली अनिश्चितता

- Advertisement -

या सगळ्यांचे प्रतिकूल परिणाम शेअरबाजारात उमटलेले आज (सोमवारी) बघायला मिळाले. मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सेन्सेक्स १८०० अंकांनी कोसळला तर, निफ्टीही १३३०० अंकांपर्यंत घसरला.

ओएनजीसी, इंडसइंड बँक, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय आणि एल अँड टीच्या शेअर्समध्ये ८.५४ टक्क्यांनी घसरण झाली. मागच्या आठवडयाच्या शेवटच्या सत्राची सुरुवातच तेजीसह करताना मुंबई निर्देशांक प्रथमच ४७ हजारावर पोहोचला होता. पण करोनाचा नवीन स्ट्रेन आढळला असून जगातील अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आले आहेत. ब्रिटनमध्ये लॉकडाउन कडक करण्यात आला आहे. या सर्वाचा सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सवर प्रतिकुल परिणाम झाला.

मागच्या आठवडयाच्या शेवटच्या सत्राची सुरुवातच तेजीसह करताना मुंबई निर्देशांक प्रथमच ४७ हजारावर पोहोचला होता. पण करोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळल्याने जगातील अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आले आहेत.

दरम्यान, ब्रिटनमध्ये करोना वायरसच्या नव्या प्रजातीचं रूप आणि त्यामुळे करोना रूग्णांची संख्या वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर युके मध्ये लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत. या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता भारताने देखील युके- भारत विमानसेवा तात्पुरती खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

युकेमधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. युनायटेड किंग्डममध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. करोना व्हायरसच्या नवीन प्रकाराचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. युकेमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाउन पुन्हा एकदा लागू केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तिथल्या विमानांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. २२ डिसेंबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत जी विमानं युकेहून मुंबई किंवा भारतात ज्या ठिकाणी येतील त्यातील प्रवाशांना करोना चाचणी करणं आवश्यक असणार आहे. विमान तळांवर युकेहून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या