Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यापरमबीर सिंह यांच्या 'लेटर बॉम्ब'वर शरद पवार यांचं मोठं विधान

परमबीर सिंह यांच्या ‘लेटर बॉम्ब’वर शरद पवार यांचं मोठं विधान

मुंबई | Mumbai

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या कथित पत्रानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य केलं. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- Advertisement -

शरद पवार यांनी म्हंटल आहे की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर असले तरी त्या पत्रावर त्यांची स्वाक्षरी नाही तसंच सचिन वाझे यांनी पुन्हा पोलिस सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांचाच असल्याचा खळबळजनक आरोप शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे वाझे यांच्या पुर्ननियुक्तीत मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा हात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच या प्रकरणात गृहमंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. परमबीर सिंग मलाही भेटले होते. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडलं होतं. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं होतं. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितलं नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, १०० कोटी कोणाकडे गेले याचा उल्लेख पत्रात करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे बदली झाल्यानंतर परमबीर यांनी आरोप केले. आयुक्त असताना त्यांनी कोणतेही आरोप केले नाहीत. मनसुख यांची गाडी वाझे यांनी घेतली आणि त्यात स्फोटकं ठेवली, असंही ते म्हणाले.

तसंच देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर हे पत्र समोर आल्याचंही ते म्हणाले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या मंत्रीपदाबाबतही मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असला तरी त्यात यश येणार नाही हे ही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेपूर्वीच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे त्यांनी सांगितले.

परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात काय म्हटलं?

सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर अनेकदा बोलवलं. यावेळी गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास १ हाजर ७५० बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील इतर काही बाबींचा समावेश होता. ज्यातील प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा करण्याचं म्हटलं होतं. म्हणजे महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये होतील. तर उर्वरित पैसे इतर बाबीतून मिळवता येतील. असा दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पत्रक जाहीर करुन आपली बाजू मांडली आहे. तसेच परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. अनिल देशमुखांनी पत्रकात म्हंटलं आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वत:चा बजाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरुन परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही? आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरुन हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्च रोजी पाटील यांना व्हॉट्सअॅप चॅट वरुन काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळवली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरुन उत्तरे मिळवताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरुन आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहोत. याचा अर्थ काय?. पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे आणि एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वत:च्या अधिकारात घेतला. परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनकसानीचा खटला दाखल करत आहे.’ असे त्यांनी म्हंटल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या