Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयशरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई l Mumbai

सध्या राज्यात अनेक मुद्यांवरून राजकारण तापलेले आहे. विरोधी पक्ष देखील मराठा आरक्षण, शेतकरी मदत, परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्याचे थकीत वेतन आणि अर्णब गोस्वामी या प्रकारणांवरून राज्यसरकार वर जोरदार टीका करत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर या दोन्ही नेत्यांची पार पडली आहे.

- Advertisement -

यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्था सातारा तर्फे मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीस मदत दिली आहे. तब्बल २ कोटी ७५ लाख रुपये निधीचा चेक त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. आपल्या ट्विटर हॅण्डल वरून शरद पवार यांनी माहिती दिली आहे.

शरद पवार यांनी म्हंटले आहे की, “करोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला. सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये २,७५,९२,८२१/- इतकी रक्कम संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली.”

- Advertisment -

ताज्या बातम्या