शुक्रवारी शरद पवार धुळे-नंदुरबार जिल्ह्यात

jalgaon-digital
2 Min Read

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे 20 व 21 नोव्हेंबर रोजी धुळे, नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासह काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. पवार यांचा प्रस्तावित दौरा समाज माध्यमांवर व्हायरल होत असून 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता त्यांची गोंदूर विमानतळावर आगमन होईल.

सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान ते तालुक्यातील मेहरगाव येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील. कुसुंबा मार्गे धुळ्यात आल्यानंतर काही वेळ विश्रांती घेवून दुपारी अडीच ते साडेचार वाजेच्या दरम्यान शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात आयोजित मेळाव्यात संबोधित करतील.

सायंकाळी 5.30 वाजता हॉटेल चंद्रदीपमध्ये ते पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर 7 ते 8 वाजेच्या दरम्यान काही युवकांशी संवाद तर लगेचच शहरातील वकील प्रतिष्ठीत नागरिकांशी संवाद साधतील. याच ठिकाणी त्यांचा मुक्काम राहिल.

दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता शिंदखेड्याकडे रवाना होवून 11 वाजता येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावरील शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन करतील. दुपारी काही वेळ विश्रांती घेवून 2 वाजेनंतर ते नंदुरबारकडे रवाना होतील.

दुपारी 3.30 वाजता नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर श्री. पवार हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, किरण पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या दौर्‍यांच्या निमित्ताने जोमाने कामाला लागले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *