Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Andolan : शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेणार जालन्यातील मराठा आंदोलकांची...

Maratha Andolan : शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेणार जालन्यातील मराठा आंदोलकांची भेट

मुंबई | Mumbai

गेल्या चार दिवसांपासून जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतवरली सराटी गावामध्ये (Antwarli Sarati Village) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण (Hunger Strike) करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी (Police) काल (दि.०१ सप्टेंबर) रोजी लाठीचार्ज केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे आंदोलकांनी (Protester) आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणवार जाळपोळ झाली. तसेच यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस देखील जखमी झाले आहेत….

- Advertisement -

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; ‘अशी’ असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

त्यानंतर आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटतांना दिसत असून या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मराठा समाजाकडून (Maratha Community) आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे या लाठीचार्जवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत राजकीय वातावरण चांगलेचे तापवले आहे. आज सकाळी अंतवरली सराटी गावामध्ये जाऊन छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी आंदोलकांची भेट घेतली. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आज अंतवरली सराटी गावामध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Video : नाशकात मराठा समाजाकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी

शरद पवार (Sharad Pawar) थोड्याच वेळात या आंदोलकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर जालन्यातील अंबड (Ambad) येथील रुग्णालयाला ते भेट देतील. यानंतर शरद पवार हे वादीगोदरी रुग्णालयात (Vadigodari Hospital) जाऊन जखमींची विचारपूस करणार आहेत. जखमींची विचारपूस केल्यानंतर शरद पवार हे आंदोलन सुरु असलेल्या अंतरवली सराटी गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या कारखान्यावर शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.

चंद्रानंतर आता ‘इस्रो’चा ‘सूर्य नमस्कार’! ‘आदित्य एल१’चं आज प्रक्षेपण; नेमकं काय साध्य होणार? जाणून घ्या सविस्तर

तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संध्याकाळी अंबड आणि आंतरवाली सराटी गावांना भेट देणार असून ते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. तसेच पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना देखील उद्धव ठाकरे अंबड येथील शासकीय रुग्णालयात जाऊन भेटणार आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे सायंकाळी सहा वाजता विमानाने पोचल्यानंतर ते आपल्या वाहनाने अंबड आणि आंतरवाली सराटी गावांना भेट देणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या