Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसाधू-संतांसह शंखनाद आंदोलन करणार; महाविक‍ास आघाडीवर टीका

साधू-संतांसह शंखनाद आंदोलन करणार; महाविक‍ास आघाडीवर टीका

नाशिक । प्रतिनिधी

साधूंच्या वेशातील काही भोंदूंनी गैरवर्तन केले म्हणून कठोर त्याग करून साधना करणाऱ्या साधू परंपरेला शिव्या घालणे राज्याच्या जबाबदार मंत्र्यांना शोभत नाही. हा समस्त साधू परंपरेचा अपमान आहे. साधूंचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नसून, साधूंना शिव्या घालणारे विजय वडेट्टीवार हे मनोरुग्ण मंत्री आहेत. हिंदू विरोधी हा काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहेच. त्यामुळे त्यांच्या पोटातले ओठावर आल्याची टीका भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केले…

- Advertisement -

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच साधूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करीत भोसले यांनी त्या विरोधात सोमवारी रामकुंड, पंचवटी येथे साधू-संतांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलनाचा इशरा दिला.

भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भोसले यांनी वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील महाआघाडीच्या सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, आमचा सवाल उद्धव ठाकरे यांना असून, हिंदू समाजाला हे दिवस दाखविण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का?

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, हा महाराष्ट्र साधू-संतांचा आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. मग तुमच्याच सरकारमधील मंत्री साधूंना नालायक म्हणतात, हे तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसते का?

भाजपा हिंदू संस्कृती आणि साधू-संत परंपरेचा पुरस्कार करणारा पक्ष असून, या परंपरेबद्दल काहीही बेताल वक्तव्य करण्याचा अधिकार कुणाला नसल्याचे त्यांनी यावेली सांगितले.

वडेट्टीवार आणि ठाकरे सरकारच्या निषेधार्थ आम्ही नाशिकच्या रामकुंडावर साधू-संतांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन करणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या