Saturday, April 27, 2024
Homeनगरशंकर लावरे यांना पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार

शंकर लावरे यांना पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार

सोनई (वार्ताहर) –

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठार्फे वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणार्‍या विविध नामवंत पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली

- Advertisement -

असून त्यात मुळा एज्युकेशन सोसायटीचे सोनई येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांना यावर्षीचा ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्राचार्य डॉ. लावरे यांना विद्यार्थी व शिक्षक यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्राचार्य लावरे यांचा नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर असतो. त्यांचे 4 पेटेंट, 100 राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय शोध निबंध, 15 क्रमिक पुस्तके व 4 आंतरराष्ट्रीय संदर्भग्रथ प्रकशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठात बारा विद्यार्थ्यानी पीएचडी संशोधन पूर्ण केले.

मुळा एज्युकेशन सोसायटीचे शिक्षकवृंद माजी खासदार यशवंतरावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काम करत असतात. संस्थेसाठी काम करणार्‍या प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांना मिळालेला प्रतिष्ठेचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार व त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीचा माझ्यासह संपूर्ण मुळा एज्युकेशन परिवाराला अभिमान आहे.

– प्रशांत गडाख अध्यक्ष, मुळा एज्युकेशन सोसायटी

- Advertisment -

ताज्या बातम्या