Friday, April 26, 2024
Homeनगरशिंगणापुरात पहिल्या दिवशी साडेतीन हजार भाविकांचे शनीदर्शन

शिंगणापुरात पहिल्या दिवशी साडेतीन हजार भाविकांचे शनीदर्शन

सोनई, गणेशवाडी |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील शनीशिंगणापूरचे दर्शन अखेर पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

- Advertisement -

पहाटे साडेचार वाजता त्रिंबक महाराज यांच्याहस्ते आरती झाल्यानंतर मुख्य दरवाजा लगत असलेल्या छोट्या द्वारामधून दर्शनाला सुरुवात करण्यात आली.

गेल्या आठ महिन्यांपासून करोना या आजारचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सर्वच मंदिर व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शासनाने दिलेले नियम पाळत दर्शनासाठी सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत आतषबाजी करत केले. करोना सारख्या आजाराचा धोका टाळण्यासाठी दहा वषार्र्ंच्या आतील मुलांसाठी व पासष्ट वर्षावरील वृध्दांसाठी याठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

रोज फक्त सहा हजारच भाविकांना याठिकाणी दर्शन घेता येईल. सोबत तेलाव्यतिरिक्त आत काही नेता येणार नाही. शासन नियमांचे पालन म्हणून हात-पाय धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चौथर्‍यापासून काही अंतरावरून दर्शन घ्यावे लागत आहे. दर्शन रांगेत सॅनिटायझरचे स्वयंचलित यंत्र बसवण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी साडेतीन हजाराच्या वर भाविकांनी शनीदर्शन घेत समाधान व्यक्त केले.

शनिदर्शनासाठी ई-पास आवश्यक असून देवस्थानने वाहनतळ परिसरात पास वितरणची व्यवस्था केली असल्याचे तांत्रिक अधिकारी नितीन शेटे यांनी सांगितले. दोन दिवसांनंतर गावातील पुजासाहित्य, स्टेशनरी व तेलविक्रीची दुकाने उघडली आहेत. मोठे हॉटेल, देवस्थानचे भोजनालय व प्रसाद विक्री सुरू झालेली नाही.

आठ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शनी मंदिर खुले झाल्याने आमच्यावर एकप्रकारे शनीदेवाची मोठी कृपा झाली. काही महीन्यांपासून सर्वंच बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली होती.

– भिमराज महाले, गाळाधारक, शनीशिंगणापूर

- Advertisment -

ताज्या बातम्या